top of page
Email Id adarshagashivnagar@gmail.com Contact No. 9881561794 / 7057799082

School Event Gallery

शिवजयंती
19 फेब्रुवारी - शिवजयंतीनिमित्त आपल्या विद्यालयात छ .शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते . विद्यार्थी या दिवशी शिवराय, मावळे अशा वैविध्यपूर्ण पारंपरिक वेशभूषेत विद्यालयात उपस्थित राहतात. शिवरायांच्या कार्याविषयी माहिती दिली जाते .महिला पालकांच्या हस्ते बालशिवाजींचा पाळणा गायन शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगणारी विद्यार्थी मनोगते , पोवाडे ,शिवचरित्र विषयक गीते सादर होतात. त्यानंतर, आगाशिवनगर परिसरात लेझीम , झांजपथक, शिवगीतावरील नृत्य, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात भव्य अशी मिरवणूक काढली जाते. भव्यशाही मिरवणुकीत विद्यार्थी, पालक ,विद्यालय परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतात.

शिष्यवृत्ती विभाग – गुरुकुल पॅटर्न
स्पर्धा परीक्षांचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा म्हणून आपल्या विद्यालयात गुरुकुल पॅटर्न राबविला जातो. इयत्ता पहिली पासून मंथन सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. शिष्यवृत्ती वर्गाची तयारी अधिक व्हावी यासाठी संस्थेअंतर्गत मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी व 7वीच्या वर्गासाठी घेतली जाते . विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यावेत यासाठी तयारी करून घेतली जाते. जवळजवळ 100 सराव प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप चे सोडवून घेतले जातात.
शिष्यवृत्ती परीक्षेचा चांगला अभ्यास होण्यासाठी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेने इयत्ता- चौथी ,इयत्ता -सातवी साठी श्री मळाई देवी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 पासून सुरू केली त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो .इयत्ता -पाचवी, इयत्ता- आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दरम्यान त्यांना कसलीही भीती वाटत नाही व ते शिष्यवृत्तीधारक होतात.

बालबझार

गणेशोत्सव
गणेश उत्सव शाळेत गणपतीची सुबक मूर्ती आणून विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. दररोज सकाळ - संध्याकाळ आरतीचा कार्यक्रम केला .यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने कराड शहराची प्रतिकृती उत्कृष्ट असा देखावा तयार केला. यानिमित्त फनी गेम्स , हळदी कुंकू समारंभ,रांगोळी स्पर्धा अथर्वशीर्ष व आरती पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात चिमुकल्यानी लाडक्या गणरायाला निरोप दिला.

स्वयंशासन दिन
शिक्षक दिन डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. शिक्षक- विद्यार्थी यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.
सदर दिवशी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली .तसेच ,श्री मळाईदेवी नागरी पतसंस्थेच्या वतीने शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच सदर दिवशी आपल्या विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इतर वर्गांना अध्यापन केले. विद्यार्थी शिक्षकांनी सदर दिवशीचे सर्व कामकाज पाहिले व आगळ्यावेगळ्या अनुभवास स्पर्श केला. या दिवशी विद्यार्थ्यांमधूनच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई निवडण्यात आले आणि शेवटी त्यांच्या मनोगताचा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला .

सहल विभाग
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच पुस्तकाबाहेरील जगाची ओळख व्हावी तसेच आपल्या परिसरातील हवामान, पिके, क्षेत्रफळ, लोकजीवन यांची ओळख व्हावी म्हणून आपल्या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन , सहलीचे आयोजन करण्यात आले. यामधील पहिली सहल ही इयत्ता पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांसाठी मुक्कामी सहलीचे आयोजन केले होते सदर सहल ही अजंठा, वेरूळ लेणी, खुलताबाद, छत्रपती संभाजी नगर ,शिर्डी, मोरगाव घृणेश्वर या ठिकाणी गेली.
तदनंतर दुसरी एकदिवसीय सहल ही इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी कोकण दर्शन सहलीचे आयोजन केले. गणपतीपुळे, नाणीज, थिबा पॅलेस, रत्नागिरी या ठिकाणी एक दिवसीय जाऊन आली. बालवाडी ची सहल मराठवाडी धरण, फुलपाखरू उद्यान व श्री जकुआई भवानी माता मंदिर आंब्रुळकरवाडी या ठिकाणी गेली.

नवागत स्वागत
मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी विद्यालयात नवागत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. सकाळी ठीक साडेदहा वाजता नवागत स्वागत समारंभाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक - श्री शिंदे सर यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले .आंनददायी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चक्क जंगली प्राणी- एलिफंट आणि छोटा भीम , डोरेमॉन, जोकर्स कार्टूनच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे औक्षण व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेटस्वरूपात देण्यात आल्या.जंगल जंगल बात चली हे.., ससा हो ससा.... यासारख्या बालगीतांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. दुपारनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आल्या. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात नवागातांचा स्वागत समारंभ संपन्न झाला .

दिंडी सोहळा
शनिवार दि. १३/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. यामध्ये बालवाडी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
आषाढी वारीतील हरिनाम गजर खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीच्या माळा आणि डोईवर तुळशी धरून विठ्ठल रखुमाई अशा प्रकारचा दिंडी सोहळा "ज्ञानोबा तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी" अश्या गजरात विद्यालयामध्ये पार पडला.
पालखी त्यामागे वारकरी पेहरावातील बालचमू विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, आदी व्यक्तिरेखा अशी रचना करण्यात आली. ही दिंडी पाहणाऱ्यांच्या मनात भक्तीभाव निर्माण करत होती आणि उपस्थितांची वाहवा मिळवत होती

रक्षाबंधन व राखी प्रदर्शन
भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला एका रेशीम धाग्यात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन या पवित्र प्रेमाची माहिती शाळेतील मुला मुलींना व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनास पालक भेट देतात व स्वतःचा अभिप्राय नोंदवतात राखीचे महात्म्य व कल्पकता समजण्यासाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी सर्व मुली सर्व मुलांना राखी बांधतात मुलींनी राखी बांधल्यानंतर मुले मुलींना भेटवस्तू देतात अशा प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो

राष्ट्रीय सण
15 ऑगस्ट स्वातंत्रदिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
सदर दिवशी स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी केलेला त्याग आनंदाने केलेले बलिदान या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस व आपल्या राष्ट्राविषयी राष्ट्रप्रेम जागृत करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो.
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीची सर्व विद्यार्थी गणवेशात हजर होते. छात्रसैनिकांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थी भाषणे, गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ , ध्वजारोहण, कवायत संचलन ,लेझीम, झांजपथक ,
मानवी मनोरे, सूर्यनमस्कार , युद्धप्रसंग योगासने, समूहगीते गायन झाले. सर्वात शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

वार्षिक स्नेहसंमेलन
प्रत्येक विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना संधी मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांची अंगभूत कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांकडून विविध कलाविष्कार सादर केले जातात. या हेतूने विद्यालयांमध्ये विविध गुणदर्शनचा कार्यक्रम वार्षिक स्नेहसंमेलन दि. 13/12/2024 रोजी आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाची वेळ दु.1 ते 5 अशी होती.
प्रथम प्रमुख पाहुण्यांचे हस्ते स्टेज उद्घाटन दीप प्रज्वलन करण्यात आले भव्य स्टेज, उपस्थित प्रेक्षक वर्ग, झगमगाट करणारी रोषणाई अशा वातावरणामध्ये गजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमांमध्ये भक्ती गीत, देशभक्तीपर गीत ,कोळी गीत,आजी - आजोबा थीम, बालगीते, नाटिका, शेतकरी गीत, असे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले .

परिसर निरीक्षण सहल व क्षेत्रभेट
2024 रोजी इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परिसर निरीक्षण सहल व क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत भोसगाव - फुलपाखरू उद्यान व मराठवाडी धरण तसेच मानेचीवाडी -पहिले सौर गाव या ठिकाणी नेण्यात आली.
सकाळी ठीक साडेआठ वाजता वाहनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना मराठवाडी धरण या ठिकाणी नेण्यात आले .विद्यार्थ्यांनी धरण परिसर निरीक्षण केले .ठीक अकरा वाजता भोसगाव येथील फुलपाखरू उद्यान येथे विद्यार्थ्यांना नेण्यात आले. तेथे विविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . दुपारी एक वाजता मानेची वाडी महाराष्ट्रातील पहिले सौरगाव पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत 100% वीज बिल मुक्त गाव तसेच माझी वसुंधरा पुरस्कार प्राप्त असलेल्या गावाची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. तेथील सरपंचांनी गावातील योजनेबद्दल माहिती सांगितली .अशाप्रकारे भोसगाव फुलपाखरू उद्यानात विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात व आल्हाददायक वातावरणात परिसर निरीक्षण सहल व क्षेत्रभेट पार पडली.

श्री मळाई देवी शिक्षण संस्था वर्धापन दिन
संस्था उभारणीसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या चैतन्य महाराजांविषयी माहिती सांगण्यात येते. सकाळी परिपाठानंतर श्री मळाई देवी व ब्रम्हीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते .संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी मनमुराद आनंद घेतात.अशा प्रकारे मोठ्या उत्साहात श्री मळाई देवी शिक्षण संस्था वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.
bottom of page