Email Id adarshagashivnagar@gmail.com Contact No. 9881561794 / 7057799082

मुख्याध्यापक मनोगत
-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर आगाशिवनगर परिसरात एक प्राथमिक शाळा असावी या हेतूने इ. स. २००३ साली स्थापन झालेले आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर हे आपले विद्यालय आज विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा क्रीडात्मक,गुणात्मक,कलात्मक, अर्थात सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने अग्रेसर ठरत आहे.
-
एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली ही शाळा. इयत्ता पहिली ते सातवी शासकीय शिष्यवृत्ती, श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती,चित्रकला -एलिमेंटरी व इंटरमिजिएट, स्पीड मॅथ्स, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, इतर सर्व स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासणारी व ॲथलेटिक्स, वैयक्तिक व सांघिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांतील क्रीडात्मक गुणांचा विकास करून त्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणारी व आजच्या स्पर्धेच्या व डिजिटल युगात अध्यापन तंत्रात काळानुसार बदल करून स्मार्ट टीव्ही द्वारे अध्यापन करणारी आपले आदर्श विद्यालय आज लोकांच्या पसंतीस उतरत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची व्यवस्था,उच्च प्रशिक्षित शिक्षक,शिक्षिका व भौतिक सुविधांसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व विविध सेवाभावी संस्थांची बहुमोल स्वरूपात मिळणारी मदतीमुळे आमचे विद्यालय सरस ठरत आहे.
-
याबरोबरच आपल्या आदर्श विद्यालयाचा गुणवत्तेचा पॅटर्न पालकाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्थरावर विद्यार्थी लागले. शाळेच्या नावलौकिकात भर पडली.
-
वेबसाईटला भेट देऊन आपण आमच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर आगाशिवनगर परिसरात एक प्राथमिक शाळा असावी या हेतूने इ. स. २००३ साली स्थापन झालेले आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर हे आपले विद्यालय आज विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा क्रीडात्मक,गुणात्मक,कलात्मक, अर्थात सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने अग्रेसर ठरत आहे.
एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली हि शाळा. इयत्ता पहिली ते आठवी शासकीय शिष्यवृत्ती, श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती,चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट, स्पीड मॅथ्स, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, इतर सर्व स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासणारी व अथलेटिक्स, वैयक्तिक व सांघिक खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांतील क्रीडात्मक गुणांचा विकास करून त्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणारी व आजच्या स्पर्धेच्या व डिजिटल युगात अध्यापन तंत्रात काळानुसार बदल करून स्मार्ट टीव्ही द्वारे अध्यापन करणारी आपले आदर्श विद्यालय आज लोकांच्या पसंतीस उतरत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही ची व्यवस्था,उच्च प्रशिक्षित शिक्षक,शिक्षिका व भौतिक सुविधांसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व विविध सेवाभावी संस्थांची बहुमोल स्वरूपात मिळणारी मदतीमुळे आमचे विद्यालय सरस ठरत आहे.
याबरोबरच आपल्या आदर्श विद्यालयाचा गुणवत्तेचा प्याटर्णला पालकाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्थरावर विध्यार्थी लागले. शाळेच्या नावलौकिकात भर पडली.
वेबसाईटला भेट देऊन आपण आमच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..

श्री सचिन व्यंकटराव शिंदे
मुख्याध्यापक

उद्दिष्टे
1. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – केवळ शैक्षणिक नव्हे तर शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक विकास घडवणे.
2.चांगले संस्कार देणे – प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी, सहकार्य, देशप्रेम, पर्यावरणप्रेम यासारख्या मूल्यांचा विकास करणे.
3.गुणवत्तापूर्ण शिक्षण – दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त पद्धतीने ज्ञान देणे जे आयुष्यात उपयोगी पडेल.
4.सर्जनशीलता व कौशल्य विकास – चित्रकला, संगीत, क्रीडा, विज्ञान प्रयोग, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देणे.
5.आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती – व्यायाम, योग, क्रीडा, पौष्टिक आहार व स्वच्छतेची सवय लावणे.
6.स्वावलंबन व नेतृत्वगुण – विद्यार्थ्यांना निर्णय घेणे, जबाबदारी पेलणे आणि नेतृत्व करण्यास प्रोत्साहन देणे.
7.पर्यावरण संवर्धन – निसर्गप्रेम, वृक्षारोपण, पाणी बचत, स्वच्छता या उपक्रमांतून जबाबदारीची जाणीव करणे.
8.समाजाभिमुखता – समाजसेवा, मदतकार्य, सहजीवन यांचा अनुभव देऊन विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणे.
9.तंत्रज्ञानाचा योग्य वापर – संगणक, इंटरनेट, एआय, विज्ञान यांचा शैक्षणिक व उपयुक्त वापर शिकवणे.
10.आनंददायी व सुरक्षित वातावरण – शाळा ही मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी आणि आनंदाने वाढण्यासाठी सुरक्षित व प्रेरणादायी जागा असावी.