Email Id adarshagashivnagar@gmail.com Contact No. 9881561794 / 7057799082
आमची सुविधा

सुसज्ज प्रयोगशाळा
प्रयोग शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गासाठी प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध आहेत .तसेच सर्व वर्गाचे नियमित प्रयोग शाळेत तास घेतले जातात. भूगोल विषयासाठी लागणारे नकाशे, पृथ्वीगोल, प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. विज्ञान विभागामार्फत विज्ञान प्रदर्शन, सर्प विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, छोटे सायंटिस्ट, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. ज्ञान प्रबोधिनी पुणे आयोजित छोटे सायंटिस्ट स्पर्धेमध्ये विद्यालय तृतीय क्रमांक मिळालेला आहे. या स्पर्धेमध्ये ओम खाडे, अनघा काकडे, वीरता लोहार, आयुषमान थोरात ,स्वराज देशमुख हे विद्यार्थी सहभागी झाले होते.तसेच डॉक्टर सी व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षेस विद्यार्थी बसलेले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी विद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो.

प्रशस्त क्रीडांगण
आपल्या आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर या ठिकाणी अध्यापनाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व दिलं जातं. शाळेला प्रशस्त असे क्रीडांगण उपलब्ध आहे. सहा वर्षे वयोगटापासून ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा खेळाचा सराव करून घेतला जातो. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण ओळखून त्यांच्या कौशल्याचा विकास होण्याच्या दृष्टीने आपल्या विद्यालयांमध्ये उन्हाळी क्रीडा शिबिर आयोजित केले जाते. विविध क्रीडा स्पर्धा संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धा आणि जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अँथलेटिक्स क्रीडा स्पर्धा अशा विविध क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतात व यशस्वी होतात.

अत्याधुनिक संगणक कक्ष
आपल्या विद्यालयात सुसज्ज अशी संगणक रूम उपलब्ध आहे त्याचबरोबर डिजिटल क्लासरूम, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर अशा विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर केला जातो. विद्यार्थ्यांना अध्यापनाची गोडी वाढण्याच्या दृष्टीने स्मार्ट टीव्हीचा अध्यापनात वापर केला जातो.
इयत्ता बालवाडी पासून ते आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत दररोज संगणक तासिका असतात.

सी. सी. टीव्ही ची सोय
विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सी. सी. टी.व्ही, कॅमेऱ्याची सोय

प्रशस्त वर्ग खोल्या
शाळेची इमारत व वर्ग खोल्या प्रशस्त व हवेशीर आहेत. प्रत्येक वर्गात ३०विद्यार्थी असतात. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्याकडे लक्ष देणे सोपे जाते. एकून १५ वर्ग खोल्या आहेत व इतर मध्ये प्रयोगशाळा, संगणक रूम , कार्यालय, व किचन या साठी ४ वर्ग आहेत.
